गणेशोत्सव 2024

Solapur : सोलापुरात घरगुती गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात

Published by : Siddhi Naringrekar

वसीम अत्तार, सोलापूर

आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे. बाप्पाची सेवा केल्यानंतर आज थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाणार आहे.

सोलापुरात घरगुती गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूर गणपती घाट येथे गणरायाचे विसर्जन करण्यात येत आहे . विसर्जन निर्विघ्न पार पडावे यासाठी पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणरायाचे विधिवत पूजा करून विसर्जन करण्यात येत आहे.

पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरातील 14 ठिकाणी गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे. सोलापूर महानगरपालिकेकडून विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीमध्ये 1344 पोलिसांचा बंदोबस्त राहणार असल्याची माहिती मिळत असून सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुका दुपारनंतर सुरु होणार आहेत.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश; मोहित कंबोज यांचं ट्विट, म्हणाले...

Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे राज्यपालांना पत्र; पत्रात काय?

कोलकाता येथील डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरण; 41 दिवसांनी डॉक्टरांचा संप मागे

Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ; मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना